औरंगाबादेत आज 72 जणांना कोरोनाची लागण, तर 75 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

सध्या जिल्ह्यातील विविध भागात 673 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत सुमारे 39,431 जणांनी कोरोनावर मात केली आहे

औरंगाबाद । औरंगाबादेत कोरोनाचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. आज जिल्ह्यात 72 जणांना कोरोनाची लागण झाली असून 1 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 41 हजार 212 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यातील विविध भागात 673 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1108 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आज 75 जणांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत सुमारे 39 हजार 431 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (58)

भगतसिंग नगर (3), सिडको (1), हर्सुल (1), गणेश नगर (1), विष्णू नगर (1), खिंवसरा नगर (1), रणजीत नगर, काल्डा कॉर्नर (1), सारा राज नगर, गारखेडा (1), डिलक्स नगर (1), व्यंकटेश नगर (1), घाटी परिसर (1), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (1), सिडको एन सहा (1), नाईक नगर (1), शांतीनिकेतन कॉलनी , त्रिमूर्ती चौक (1), एन नऊ रायगड नगर (1), वेदांत नगर (1), एसबीआय, औरंगाबाद शाखा (1), अहिंसा नगर (1), केसरसिंग पार्क (2), दिवाणदेवडी (1) अन्य (34)

ग्रामीण (14)

रांजणगाव (पोळ) (1), राम नगर, पैठण (1), साई नगर, बजाज नगर (1), माऊली हॉस्पीटल, पैठण (1), लासूर रोड, गंगापूर (1), सिलेगाव (1), गंगापूर (1), अन्य (7)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

शहरातील एका खासगी रुग्णालयात एसबीओए शाळेच्या समोरील 73 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.AM News Developed by Kalavati Technologies