आम्ही तोंड उघडलं तर तोंड लपवायला जागा राहणार नाही, अमृता फडणवीसांना शिवसेना महिला विकास आघाडीचं प्रत्युत्तर

मंदिर खुली करण्याच्या मागणसाठी भाजपच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन केले होते, त्यांनंतर सत्ताधारी आणि विरोधकात चांगलेच आरोप प्रत्यारोप होत आहे

मुंबई । मंदिरं खुली करण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकात चांगलेच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. त्यानंतर मंदिरं खुली करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली. तसेच राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात लेटरवॉर सुरु झाल्याने राज्याचे राजकारण सुद्धा मोठ्या प्रमाणात तापले.

यात प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौतनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी मारली आहे. अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. त्यानंतर आता शिवसेना महिला आघाडी अमृता फडणवीसांवर आक्रमक झाली असून, महिला विकास आघाडीने अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.

ट्विटरवर नको, समोर येऊन बोला असे थेट आवाहन शिवसनेच्या महिला आघाडीनं अमृता फडणवीसांना दिला आहे. 'ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका? ती कधी राजकारणात आली? नवरा मुख्यमंत्री झाल्यानंतर ती बोलू लागली.' असा एकेरी उल्लेख करत विशाखा राऊत यांनी अमृता फडणवीसांवर निशाणा साधला. 'शिवसेनेची राजकारणाची ही चौथी पिढी आहे. आम्हाला हिंदुत्वाचे धडे देऊ नयेत. आम्ही संस्कृती जपतोय. आम्ही जर तोंड उघडलं तर तोंड लपवायला जागा राहणार नाही.' असा सणसणीत टोला विशाखा राऊत यांनी अमृता फडणवीसांना लागवला.AM News Developed by Kalavati Technologies