पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकायचा असेल तर कमळाचे बटण दाबा, केशवप्रसाद मौर्य यांचे बेताल विधान

गेल्या 70 वर्षात देशाला किड लागली असल्याचे सांगत ती दूर करण्याचे काम प्रधानमंत्री मोदी यांनी केल्याचे मौर्य यांनी सांगितले

ठाणे । जर ठाण्यातील जनतेला पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकायचा असेल तर त्यांनी 21 तारखेला कमळाचे बटण दाबा असा अजब सल्ला उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी ठाणेकरांना दिल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तान नेहमीच भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी देत असतो व या धमकीने सर्व जगासच वेठीस धरण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. त्यांच्या या धमकीला चोख प्रत्युत्तर द्यायचे असेल तर आगामी निवडणुकीत जनतेने कमळाचे बटण दाबले कि दोन अणुबॉम्ब टाकले जातील, एक नापाक पाकिस्तानवर आणि दुसरा अनुच्छेद 370 ला विरोध करणाऱ्यांवर असं विधान केशवप्रसाद मौर्य यांनी केलं आहे. त्यांच्या या जगावेगळ्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठाणे मानपाडा भगत काल भाजपशी निगडित उत्तर भारतीय संघटनेकडून स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे शहर युतीचे उमेदवार संजय केळकर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी मौर्य यांनी गेल्या 70 वर्षात देशाला किड लागली असल्याचे सांगत ती दूर करण्याचे काम प्रधानमंत्री मोदी यांनी केल्याचे सांगितले. तर याबाबत देशात अनेक प्रश्न आहे त्यावर भाजप बोलत नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.



AM News Developed by Kalavati Technologies