मराठा आरक्षणाला गरज पडल्यास 'घटनेत' बदल करू, छत्रपती संभाजी राजेंचे वक्तव्य

मराठा आरक्षणावर न्यायालयाने स्थगिती उठवली नाही तर, केंद्राच्या मदतीने घटना बदलू असे विधान संभाजी राजेंनी केले आहे

पंढरपूर । मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर समाजाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आरक्षणाचा विषय हा मुख्यत्वे राज्य सरकारचा आहे. मात्र यामध्ये केंद्र सरकारची मदत घेऊन घटना देखील बदलण्याचा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. लवकरच राज्यातील सर्व पक्षीय खासदारांना घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने केलेल्या कायद्याला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

हि स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने जोर लावावा. आम्ही सर्वतोपरी त्यांना मदत करू. राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने तात्काळ मदत द्यावी. मी छत्रपती या नात्याने रयतेसाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय साधून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. आरक्षणाचा विषय दोन्ही छत्रपतींनी केंद्राकडून सोडवून घ्यावा. असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिला होता. याविषयी बोलण्याचे मात्र संभाजीराजे यांनी टाळले. छत्रपती संभाजीराजे यांनी आज पंढरपूरच्या महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.AM News Developed by Kalavati Technologies