मुंबईवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीसांना, रेणुका शहाणेंचा सणसणीत टोला !

मुंबईच्या सुरक्षिततेच्या वक्तव्यावरून अमृता फडणवीसांना रेणुका शहाणेंनी चांगलेच झापले

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असा सामना आता पाहायला मिळत आहे. आत्महत्याच्या तपासावरून दोन्ही राज्यामध्ये वाद-विवाद होतांना दिसत आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवरच बोट ठेवून वादात उडी घेतली आहे. 'मुंबईने माणुसकी गमावली आहे, मुंबई शहर आता सुरक्षित राहिले नाही' असे वक्तव्य अमृता फडणवीसांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

तुम्ही हे असे कसे म्हणू शकता, जिथे मुंबई शहरात लाखो लोकांचे संसार चालतात. हे शहर लोकांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास ताकद देते. पण एवढंच नाहीतर विना झेड सुरक्षा सुद्धा लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवते' असं म्हणत सणसणीत टोला अमृता फडणवीसांवर लगावला आहे. तसेच, 'सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा राजकीय मुद्दा करून ट्विट करू नये, जर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अशी घटना घडली असती तर तेव्हाही असेच ट्विट केले असता का?' अशा शब्दांत रेणुका शहाणेंनी अमृता फडणवीसांना झापले.AM News Developed by Kalavati Technologies