मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी गायी गुरे बांधली तर 10 हजारांचा दंड

रस्तावर गायी-गुरांना बांधले आणि त्यांना पकडल्यास सध्या अडीच हजार रुपयांचा दंड आकारला जातो

मुंबई | मुंबईतील मंदिराबाहेर गायी गुरे बांधली तर आता 10 हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. कारण काही मंदिरांबाहेर, रस्त्यावर, चौकांमध्ये गायी-गुरांना बांधून त्यांना चारा दिला जात असतो. यावर आपला उदरनिर्वाह भागवणारे अनेक लोक मुंबईत राहतात. या लोकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून जास्त रकमेचा दंड आकारण्याची मागणी भाजपच्या नगरसेविका नेहला शाह यांच्याकडून करण्यात आली होती. आता त्यावर महापालिकेने कारवाई करण्याचा निर्ण घेतला आहे.

रस्तावर गायी-गुरांना बांधले आणि त्यांना पकडल्यास सध्या अडीच हजार रुपयांचा दंड आकारला जातो. यामध्ये वाढ करुन हा दंड आता 10 हजार रुपये करण्यात येणार आहे. अभिप्राय महापालिका प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील मंदिरे, रस्त्यांचे नाके, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी गाई-गुरे बांधलेली असतात. यासोबतच मंदिरा बाहेर बांधलेल्या गाईंना चारा देण्याच्या मोबदल्यात पैसेही घेतले जातात. आता यावर आपला उदरनिर्वाह भागवणाऱ्यांची संख्या मुंबईत मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, गाईला बांधलेल्या ठिकाणी मल-मूत्र, चारा पडून ती जागा अस्वच्छ होते. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. याचा त्रास स्थानिकांना होतो. यामुळे असे आढळून आल्यास अशी गायी-गुरे महापालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत जप्त करण्यात येतात.

यापूर्वी बांधून ठेवलेल्या गायी पकडून नेल्यानंतर त्या सोडवण्यासाठी महापालिकेकडून अडीच हजार रुपये इतका दंड आकारला जात होता. मात्र गायी गुरांना जप्त केल्यानंतर त्यांना मालाड येथे नेण्यासाठी दंडापेक्षा जास्त खर्च येत होता. हे लक्षात घेऊन कारवाई करताना दंडाच्या रकमेत वाढ करण्याची मागणी नेहला शाह यांनी महापालिका सभागृहात एका ठरावाच्या सूचनेद्वारे केली. आता त्यावर महापालिका प्रशासनाने अभिप्राय दिला आहे. यानंतर दंडाच्या रक्कमेत अडीच हजारावरून 10 हजार रुपये एवढी वाढ करणार असल्याचे सांगितले आहे.AM News Developed by Kalavati Technologies