आयसीसी महिला टी-20 रॅकिंग, भारताच्या शेफाने वर्माने गाठले अव्वल स्थान

16 वर्षाची शेफाली वर्मा टी-20 मध्ये जगात नंबर 1

मुंबई | 16 वर्षांच्या शेफाली वर्माने गगनाला भिडणारी कामगिरी केली आहे. जागतिक महिला टी -20 मध्ये शेफालीने जगातील पहिल्या क्रमांकावर बाजी मारली आहे. बुधवारी आयसीसीने जाहीर केलेल्या फलंदाजांच्या क्रमवारीत शेफालीने 19 स्थानांची झेप घेतली आणि अव्वल स्थान गाठले आहे. सध्या महिला टी -20 वर्ल्ड सुरू आहे. या वर्डकपमध्ये शेफालीने आतापर्यंत सर्वांनाच चक्रावुन टाकणारी कामगिरी केली आहे. शेफालीच्या तुफानी खेळीने भारतीय संघाला जवळपास प्रत्येक सामन्यात फायदा झाला. आणि याच कामगिरीच्य़ा बळावर भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. केवळ 18 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या शेफालीने महिला टी -20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 47, 46, 39 आणि 29 धावांचे तुफानी खेळी केली आहे. एवढेच नाही तर तिच्या ह्या खेळीमुळे दोन वेळस तिला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार मिळाला आहे.

गुरुवारी उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना इंग्लंड सोबत होणार आहे. त्यामुळे शेफाली वर्माकडून अशाच खेळीची अपेक्षा भारतीय संघ व्यवस्थापन करत आहे. महिला टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात किमान 200 धावा काढलेल्या क्रिकेटपटूंमध्ये शेफाली वर्माने आतापर्यंत 146.96 च्या स्ट्राइक रेटने 485 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट सर्वाधिक आहे. शेफालीच्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेच्या छोले ट्रायन या खेळाडूचा नंबर लागतो. ट्रायनने 140.00 च्या स्ट्राइक रेटने 756 धावा केल्या आहेत. त्यामुळे जगातील पहिली महिला उत्कृष्ट ट्राइक रेट मध्ये सुद्धा तिने बाजी मारली आहे. सलामीवीर शेफाली वर्मा 761 गुणांसह अव्वल स्थानावर आहे तर न्यूझीलंडची सुझी बेट्स 750 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.AM News Developed by Kalavati Technologies