आयसीसी महिला टी -20 । भारतीय संघाची घोषणा, हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपदाची धुरा

हरियाणाची 15 वर्षाची शेफाली वर्मा आंतरराष्ट्रीय स्तरावर काही चांगल्या कामगिरीनंतर तिची पहिली जागतिक स्पर्धा खेळण्यास सज्ज झाली आहे.

नवी दिल्ली ।  आयसीसी महिला टी -20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया येथे सुरू होणार्‍या महिला टी -20 विश्वचषकात हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत. बंगालची फलंदाज रिचा घोष संघात एकमेव नवीन चेहरा आहे.

संघात आणखी कोणतेही नवीन चेहरा नाही. हरियाणाची 15 वर्षाची शेफाली वर्मा आंतरराष्ट्रीय स्तरावर काही चांगल्या कामगिरीनंतर तिची पहिली जागतिक स्पर्धा खेळण्यास सज्ज झाली आहे.ऋचा घोषला नुकतीच महिला चॅलेन्जर ट्रॉफीमध्ये तिच्या उत्तम कामगिरीचा बक्षीस मिळाला आहे. तिच्या 26 चेंडूत 36 धावांच्या खेळीने सर्वांना प्रभावित केले. त्या खेळीदरम्यान तिने एक षटकारही लगावला.

भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (.कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, वेदा कृष्णमूर्ति, ऋचा घोष, तानिया भाटिया (विकेटकीपर), पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड़, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधति रेड्डी.AM News Developed by Kalavati Technologies