'त्या' पीडितेला न्याय मिळावा यासाठी मी रस्त्यावर उतरणार- खासदार नवनीत राणा

पीडित तरुणीवरून अमरावतीत राजकारण पेटले; खासदार नवनीत राणा संतप्त

अमरावती । कोरोना संक्रमित रूग्णाच्या संपर्कातील 24 वर्षीय तरुणीचा कोविड लॅबमध्ये गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर अमरावती जिल्ह्यात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. या घटनेनंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा चांगल्याच संतप्त झाले आहे, पीडित तरूणीला न्याय मिळावा यासाठी मी रस्त्यावर उतरणार असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले आहे. तर महिला या आधीच सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे मी खासदार झाले तर, देशाची पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील झाल्या आहेत. असेही नवनीत राणा यांनी सांगितले. तर अमरावती येथील आरोग्य यंत्रणा पार ढासळली आहे त्यामुळे कोविड रुग्णांचे हाल होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies