बाळासाहेबांचे स्वप्न साकार करणारच, मुख्यमंत्री सेनेचाच होणार - उध्दव ठाकरे

जे काही ठरलं होतं ते देवेंद्र फडणवीस यांना ठाऊक आहे तरीही ते मला खोटं ठरवत आहेत असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं

मुंबई । मी स्वर्गाय बाळासाहेब ठाकरे यांना मी वचन दिले होते की, एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. ते वचन पाळण्याची वेळ आता आली असून मुख्यमत्री हा सेनेचाच होईल असा विश्वास उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. मी खोटं बोलणार नाही कारण मी काही भाजपवाला नाही, मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मला खोटं ठरवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलणार नाही. माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला ते दुर्दैवी आहे. काळजीवाहूंनी असा काही प्रयत्न करु नये असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी खोटेपणा केलेला नाही, भाजपा खोटेपणा करत आहे. सातत्याने भूमिका बदलण्याचा प्रकार भाजपाने केला आहे मी दिलेला शब्द फिरवलेला नाही. मातोश्रीवर जेव्हा अमित शाह आले होते तेव्हा जे काही ठरलं होतं ते देवेंद्र फडणवीस यांना ठाऊक आहे तरीही ते मला खोटं ठरवत आहेत असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.



AM News Developed by Kalavati Technologies