मी मंत्रिपदासाठी नव्हे तर नवा महाराष्ट्र घडवायला आलोय - आदित्य ठाकरे

महाराष्ट्र बळकट करण्याचे माझे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्या. असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं

कोल्हापूर । मंत्रीपदाचे माझे स्वप्न नाही. महाराष्ट्र बळकट करण्याचे माझे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्या. असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं. आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून आपल्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारसभांना सुरवात केली. चंदगड मतदारसंघातील उमेदवार संग्राम कुपेकर आणि हातकणंगले मतदारसंघातील डॉ सुजित मिनचेकर यांच्यासाठी सभा घेतल्या. डॉ मिनचेकर यांच्या प्रचारार्थ शिरोली इथं झालेल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी मी दुष्काळ, प्रदूषण आणि बेरोजगार मुक्त महाराष्ट्राच स्वप्न बघत. मला सात बारा कोरा करण्याबरोबरच गरजू शेतकऱ्यांना 10 हजार रुपये करायचा आहे. त्यासाठी मला ताकद द्या अस आवाहन केलं. मी मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदासाठी नव्हे तर नवा महाराष्ट्र घडवायला आल्याचही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.AM News Developed by Kalavati Technologies