मी मुंबईत येतेय, कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा - कंगणा रणौत

कंगणानं नुकतेचं एक ट्विट करत सांगितलं आहे की, मी येत्या 9 तारखेला मुंबईत येत आहे. हिम्मत असेल तर अडवून दाखवा

मुंबई । सुशांतसिंह राजपूत प्रकरणात नेहमीच वाद-विवादाच्या चर्चेत असलेली अभिनेत्री कंगणा रणौतनं मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत केली होती. तसेच संजय राऊतांनी मुंबईत न येण्याची धमकी सुद्धा दिली असल्याचं वक्तव्य सुद्धा कंगणानं केलं होतं. त्यानंतर कंगणाला अनेक जणांनी सोशल मीडियावर खडसावले होते. अशातच कंगणानं पुन्हा एक ट्विट करत पुन्हा खुलं चॅलेंज दिलं आहे.

कंगणानं आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे की, "मी मुंबईत येऊ नये अशी धमकी मला देण्यात आली होती. मी येत्या आठवड्याच्या 9 तारखेला मी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला आहे. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर मला हात लावून दाखवा" असं ट्विट कंगणानं केलं आहे.

दरम्यान, कंगणानं काही दिवसांपुर्वी ट्विट करत सांगितलं होतं की, मला बॉलिवूडच्या माफियांपेक्षा मुंबई पोलीसांची जास्त भीती वाटती. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती की, जर कंगणाला मुंबईत भीती वाटत असेल तर तिने मुंबईत आपलं पाऊल ठेऊ नये.AM News Developed by Kalavati Technologies