निष्पक्ष चौकशी गरजेची, हैदराबाद एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

तेलंगण सरकारच्या बाजूने मुकुल रोहतगी हे सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करत आहेत.

नवी दिल्ली | हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाविषयी आज गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे. लोकांना सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्याची आवश्यकता असल्याचे सरन्यायाधीश शरद बोबडेंकडून स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे.

यासोबतच सुप्रीम कोर्टाने संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी तीन सदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना केली आहे. यासोबतच सुप्रीम कोर्टाने मीडियावर या प्रकरणी कोणतीतेही वृत्त प्रकाशित करण्यावर बंधन घातले आहे. सुप्रीम कोर्टाने रिटायर जज वीएस सिरपुकर यांच्या अध्यक्षेतेखाली त्रिसदस्यिय आयोग स्थापन केले आहे. या आयोगामध्ये बॉम्बे हाय कोर्टाच्या रिटायर जज रेखा बलदोटा आणि सीबीआयचे माजी निर्देश कार्तिकेयन यांचा समावेश आहे. हे तपासणी आयोग 6 महिन्यात आपला रिपोर्ट सादर करणार आहे. फायनल ऑर्डर येईपर्यंत प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर बंधन राहणार आहेत.

हैदराबादमधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणा समोर आले आणि संपूर्ण देशात संतापाचे वातावरण होते. या प्रकरणातील आरोपींवर आठ दिवसातच पोलिसांकडून गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र काही लोकांनी या एन्काउंटर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. तेलंगण सरकारच्या बाजूने मुकुल रोहतगी हे सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करत आहेत. लोकांना सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, असं सरन्यायाधीश बोबडे यांच्याकडून पोलीस विभागाला सांगण्यात आले आहे. आरोपी सराईत गुन्हेगार होते का? अशी विचारणा सरन्यायाधीशांकडून तेलंगणा पोलिसांना करण्यात आली आहे. त्यावर आरोपी हे ट्रकचालक आणि क्लीनर असल्याचे समोर आले. घटनास्थळी आरोपींना घेऊन जात असताना, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन झाले होते. त्यामुळं त्यांना रात्री घटनास्थळी घेऊन गेले. आरोपींना बेड्या घालण्यात आलेल्या नव्हत्या. त्यांनी पोलिसांकडील बंदूक हिसकावली. पोलिसांवर दगडफेक केली असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies