दोन मोटारसायकल व ट्रकच्या विचित्र अपघातात पती पत्नीचा मृत्यू

नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात असतांना घडली घटना

नांदेड | मोटारसायकलवरून नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात असलेल्या पती पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना हदगाव तालुक्यातील पळसा गावाजवळ घडली आहे. काशिनाथ राठोड आणि सुलेचना राठोड असं मृत्यूमुखी पडलेल्या पती पत्नीचे नाव आहे. माहितीनुसार नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी हे दोघेही जण मोटारसायकल वरून जात असतांना नागपुर -तुळजापुर महामार्गावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन मोटारसायकल जोराची धडक दिली. यामध्ये एका मोटारसायकलवर असलेल्या काशिनाथ राठोड आणि सुलेचना राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या मोटारसायकलवर असलेले अवधुत वटाणे व प्रशांत यमकुरे हे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. हदगाव तालुक्यात नागपुर -तुळजापुर या राष्ट्रीय महामार्गाचे काम लॉकडाऊनमुळे सद्या बंद आहे काम अर्धवट स्थितीत असल्याने रस्त्यावरील धुळीमुळे पुढून येणारे वहान दिसत नसल्याने हा अपघात झाल्याची प्राथामिक माहिती मिळत आहे. पोलीस या ट्रक चालकाचा शोध घेत आहे.AM News Developed by Kalavati Technologies