वाशिम जिल्ह्यात भूक बळी, जेवण न मिळाल्याने 65 वर्षीय महिलेचा मृत्यू

ही महिला मूळची वाशिम जिल्ह्यातील बेलमंडल गावची असल्याची माहिती

वाशिम | सध्या लॉकडाउन सुरू आहे. या काळात गरिबांचे मोठे हाल होत आहे. अनेकांना पायपीट करतांना, काहींना भुखेने आपला जीव गमवावा लागत आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा बस स्थानकावर एका महिलेचा मृतदेह आढळून आलाय. या महिलेचा मृत्यू भुखेने झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बस फेऱ्या बंद असल्याने ही 65 वर्षीय महिला येथेच वास्तव करीत होती. ही महिला मूळची वाशिम जिल्ह्यातील बेलमंडल गावची असल्याची माहिती मिळत असून मुलांनी तिला घराबाहेर काढल्याने गेल्या 4 वर्षा पासून भीक मागून आपलं पोट भरत होती. मात्र गेल्या 4 दिवसा पासून खायला काही मिळाल नसल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या महिलेचा कालच मृत्यू झाला होता. या संदर्भात बस व्यवस्थानाने पोलिसात कालच तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही.AM News Developed by Kalavati Technologies