‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष 2019’चा मान हृतिकला, तर दुसऱ्या क्रमाकांवर 'हा' प्रसिद्ध अभिनेता

टायगर पहिल्यांदाच या यादीत चौथ्या क्रमाकांवर आला आहे.

मुंबई | जगातील 50 सेक्सिएस्ट एशियन पुरुषांच्या यादीमध्ये हृतिक रोशन एक नंबवर आघाडीवर आहे. ब्रिटनच्या इस्टर्न आय या मॅगझिनने ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुषा’च्या नावासाठी ऑनलाइन पोल घेतला होता. यामध्ये बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला सर्वात जास्त मते मिळाली आहे. गेल्या दहा वर्षांमधील सर्वात जास्त मते हृतिकला मिळाली आहेत. यामुळे तो आता ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष 2019’चा मान त्याने पटकावला आहे. तर शाहिद कपूर 2019 च्या या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर टायगर पहिल्यांदाच या यादीत चौथ्या क्रमाकांवर आला आहे.

हृतिकला हा मान मिळाल्यानंतर त्याने सोशल  मीडियावर पोस्ट करत सर्वांचे आभार मानले आहेत. तो म्हणाला की, 'मला मत दिलेल्यांचे सर्वात पहिले मनापासून आभार मानतो. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये व्यक्तीचे दिसणे माझ्यासाठी महत्त्वाचे नसते. मी एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरुन त्याचे परिक्षण करत नसतो. त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात काय मिळवले आहे, त्याचा जीवन प्रवास कसा होता आणि एखाद्या गोष्टीला ती व्यक्ती कशी सामोरी जाते हे मी पाहतो’ असे हृतिक म्हणाला आहे.

View this post on Instagram

When you become the pose. Or has the pose become you?

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

हृतिकविषयी लिहिताना असजदने सांगितले की, तो सेक्सिएस्ट एशियन मॅनसाठी सर्वात जास्त मत मिळवणारा स्टार बनला आहे. तर 2019 मध्ये त्याचे दोन चित्रप सुपर 30 आणि वॉरमुळे त्याचा चार्म टिकून राहिला. ऑल राउंडर टॅलेंटेड स्टार, सकारात्मकता, आंतरिक शक्ति आणि आरोग्याचा प्राधान्य देणारा हृतिक सध्याच्या दशकातील सर्वात सेक्सी एशियन मॅन म्हणून निवडला गेला आहे.AM News Developed by Kalavati Technologies