8 जुलैपासुन निवासी हॉटेल्स-लॉज उघडणार- राज्य सरकारची मोठी घोषणा

क्षमतेच्या 33 टक्के ग्राहकांना परवानगी

मुंबई । कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यामुळे लॉकडाउन ही संकल्पना राज्यात लागू करण्यात आली होती. त्यामुळे सर्वच व्यवहार हे ठप्प झाले होते. मात्र मिशन बिगीनच्या दुसऱ्या टप्प्यात हॉटेल्स वगळता सारेच व्यवसाय सुरु करण्यात आले होते. परंतु आता निवासी हॉटेल्स आणि लॉज येत्या 8 जुलैपासुन सुरु करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेशही सरकारकडून जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात हॉटेल्स मोठ्या प्रमाणात आहे या पार्श्वभुमीवर हा व्यवसाय पुर्वपदावर कसा आणता येईल यावर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली.

मुंबई, पुणे, नागपुर, औरंगाबाद सारख्या तसेच महापालिका असलेल्या क्षेत्रात अटी शर्तीसह निवासी हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस ठेवण्यात आली आहे. कंन्टेनमेंट झोनपासुन दुर असलेल्या हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस यांच्या क्षमतेच्या 33 टक्के ग्राहकांना ही परवानगी देण्यात आली आहे. तसेच उर्वरीत राज्यातही हिच अट कायम ठेवण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies