अमरावती | गरम पाण्याचा नळ तुटला, 4 विद्यार्थी भाजले, मिल्ट्री स्कूलमधील घटना

मुकुंदराव पवार मिल्ट्री स्कूलमध्ये ही घटना घडली

अमरावती | आज सकाळी अंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर गरम पाण्याचा नळ तुटून पाणी पडल्याने चार विद्यार्थी भाजल्याची घटना घटली आहे. अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव येथील मुकुंदराव पवार मिल्ट्री स्कूलमध्ये ही घटना घडली. यामध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याला नागपूर येथे उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. तर तीन विद्यार्थ्यांवर ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies