निलंग्यात अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे

अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांचे निवेदन महिला व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले

लातूर । महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वाखाली येथील पंचायत समितीच्या मैदानात हे धरणे आंदोलन करण्यात आले. निलंगा तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन महिला व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले. येथील महिला व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना विनंती करूनही अद्याप पर्यंत अंगणवाडी सेविका व मदतनीसांना लाभ मिळाला नाही. सदरील अधिकाऱ्यांचे कामाबाबत उदासीनता दिसून येते असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.

तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा थकित प्रवास, भत्ता व बिल अदा करण्यात यावे, इंधन बिल देण्यात यावे, मोबाईलवरुन ऑनलाईन काम करण्यासाठी लागणाऱ्या डाटा नेटवर्कचे पैसे देण्यात यावे, रविवारी सुटीच्या दिवसीचे आहार वाटपाचे काम बंद करण्यात यावे, 30 एप्रिल 2014 च्या निर्णयानुसार तालुक्यातील सेवानिवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या, मयत झालेल्या, काढून टाकलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीसांना सेवासमाप्तीनंतरचा एकरकमी लाभ कर्मचाऱ्यांना मिळाला नाही, ते त्यांना तात्काळ देण्यात यावा, थकीत इंधन बिल त्वरीत देण्यात यावे, बँक खात्याशी आधार लिंक न झालेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन त्यांना देण्यात यावे अशा अनेक मागण्या घेत हा एकदिवशी धरणे आंदोलन करण्यात आला. या मागण्याची दखल न घेतल्यास दोन जानेवारी रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने देण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, जिल्हाध्यक्ष कमल बांगर, राज्य संघटक दत्ता देशमुख यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.AM News Developed by Kalavati Technologies