हिंगोली-नांदेड महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात, 1 ठार 2 गंभीर

कंटेनर व ट्रकची समोरासमोर धडक, ट्रकचालक जागीच ठार

हिंगोली । कळमनुरी ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री एकच्या सुमारास कळमनुरी जवळ असलेल्या वळणावर एका कंटेनर व ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ट्रक चालक जागीच ठार झाला असुन, ट्रकच्या समोरील भागाचा चुराडा झाल्याने ट्रकचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. शेख फारुख शेख सलीम असे अपघातात मृत्यु झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. तसेच कंटेनर सुद्धा रोड वरून खाली गेल्याने कंटेनरचा सुद्धा यात नुकसान झाले असून, या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कंटेनर हिंगोलीकडून नांदेडकडे जात असतांना हा अपघात झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies