मनसे धरणार हिंदूत्वाची कास ? ट्विटर, फेसबुकरून झेंडा गायब

23 जानेवारीलाच मनसेच्या नवीन झेंड्याच अनावरण होईल, अशी चर्चा सुरू आहे

मुंबई ।  महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता नविन रूपात आपल्या सर्वासमोर येणार आहे. मनसे आपल्या झेड्यात अमुलाग्र बदल करणार आहे. त्याचीच झलक आज पहायला मिळाली. मनसेच्या ट्विटर हॅन्डलवरील चिन्हातील झेंडा गायब झाला असून आता केवळ इजिन उरले आहे. मनसे आता आपली वाटचाल हिंदुत्वाकडे करणार असल्याच्याही चर्चा आहेत.या पार्श्वभुमीवर मनसेच्या चिन्हात झालेला हा बदल महत्वाचा समजला जात आहे.

मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी 23 जानेवारीच्या मेळाव्याची जोरदार तयारी केली आहे. बॅनर, पोस्टर, टॅगलाईन आणि प्रोफेशनल इव्हेंटप्रमाणे सगळं दिसून येत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन पक्षाचा जुना झेंडा गायब झाला आहे. यापूर्वी चार रंगाच्या झेंड्यावर रेल्वे इंजिनचे चिन्ह होते. मात्र, आता फक्त रेल्वे इंजिनच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मनसेच्या झेंडाबदलाचं जवळपास निश्चित झाल्याचं दिसून येतंय. आता, 23 जानेवारीलाच मनसेच्या नवीन झेंड्याच अनावरण होईल, अशी चर्चा सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies