सध्या पद्धतीने ईद साजरी करून पूरग्रस्तांना मदत

सध्या पद्धतीने ईद साजरी करून पूरग्रस्तांना मदत


गुहागर| अस्मानी संकटात सापडलेल्या सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांना गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथून वस्तू स्वरूपात मदत पाठवण्यात आली. शृंगारतळी येथील मालाणी ग्रुप, अंजुमन दर्दमंदाने तालिम व तरक्की शाखा गुहागर यांनी ही मदत पाठवली. तसेच साध्या पध्दतीने ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय शृंगारतळी येथील मुस्लिम बांधवांनी घेतला. काही मिनिटात लाखो रुपयांची वस्तू स्वरूपात मदत जमा झाली. ही मदत तातडीने सांगली आणि कोल्हापुरातील ग्रामीण भागात पाठवण्यात आलीय. आटा, तांदूळ, साखर, टोस्ट, बिस्किट, तेल इत्यादी साहित्य जमा करण्यात आले व ते सांगली आणि कोल्हापूरला रवाना करण्यात आले.AM News Developed by Kalavati Technologies