रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा, पोलादपूर मध्ये पुरसदृष्य परिस्थिती

सावित्री नदीच्या नदीच्या पाण्याने पातळी सोडल्याने पोलादपूर मधील शहरामधील अनेक परिसरात पाणी शिरले आहे.

रायगड | गेल्या 24 तासांपासून मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पाऊसाने झोडपून काढले आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात पावसाने रात्रभर झोडपुन काढले असून सकाळपासून जोरदार पावसानंतर पोलादपूरात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात महत्त्वाची मानली जाणाऱ्या सावित्री नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. नदीच्या पाण्याने पातळी सोडल्याने पोलादपूर मधील शहरामधील अनेक परिसरात पाणी शिरले आहे. तसेच पावसाचा जोर हा पोलादपूर येथे वाढला असून पावसाचा जोर कायम राहिला तर पूर येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies