पुण्यामध्ये अतिवृष्टी, शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर

गेल्या तीन दिवसांपासून पुण्यामध्ये जोरदार बाऊस बरसत आहे.

पुणे | बुधवारपासून पुण्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. बुधवारी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याची खबरदारी घेतली जात आहे. तसेच अतिवृष्टीमुळे आपातकालिन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये यासाठी पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना आज गुरुवारी सुटी घोषित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली.

गेल्या तीन दिवसांपासून पुण्यामध्ये जोरदार बाऊस बरसत आहे. बुधवारीपासून पावसाचा जोर वाढला आणि हाहाकार उडाला. रात्री 8 च्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले होते. शहरातील सर्व भागांमधील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. यामधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. काहींची घरे ही पाण्याखाली गेली आहेत. नारिकांना सुरक्षित हलवण्यात यश आले आहे. शहरात अतिवृष्टी होत असल्याने तसेच आपत्कालीन परिस्तिथी निर्माण झाली आहे. यामुळे पुणअयातील जिह्यातील 5 तालुक्यांच्या शाळांना आणि महाविद्यालयांना आज सुटी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.

पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  एनडीआरएफच्या तीन टीम तैनात, कात्रज, महापालिका आणि बारामतीत बचावकार्य करत आहेत. अरणेश्वर भागात पाच जणांचे मृतदेह आढळले, तर सिंहगड परिसरात कारमध्ये मृतदेह आढळला आहे. AM News Developed by Kalavati Technologies