कल्याण डोंबिवलित वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, अनेक घराचे नुकसान

जवळपास 15 ते 20 घरांचे नुकसान झाले असून अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही

ठाणे । कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात काल रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे कल्याण नजीक असलेल्या नेवळी पाडा गावात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये घरांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरावर झाड कोसळले तर काही ठिकाणी घरांचे छप्पर उडून गेले. जवळपास 15 ते 20 घरांचे नुकसान झाले असून अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.AM News Developed by Kalavati Technologies