हृदयदावक! शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

इंदापूर तालुक्यातील वडापूरी येथे दोन सख्ख्या भावाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे

इंदापूर । इंदापूर तालुक्यातील वडापूरी येथे दोन सख्ख्या भावाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अविष्कार किशोर शिर्के (वय 9) अधिराज किशोर शिर्के (वय 7) असे मृत दोघा भावंडाची नावे आहे. किशोर शिर्के आपल्या कुटुंबासह शेतात वस्तीवर राहतात. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. घरापासून जवळचं साधारण 200 मीटर अंतरावार त्यांचे स्वत:चे शेततळे आहे. दि.17 सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान अविष्कार, अधिराज आणि यांचा चुलत भाऊ नाथ हे तिघे नेहमीप्रमाणे खेळायला गेले. खेळता-खेळता ते शेततळ्याकडे गेले आणि याच दरम्यान अविष्कार आणि अधिराज हे दोघे सख्खे भाऊ शेततळ्यातील पाण्यात पडले.

ही घटना घडताच त्यांच्या सोबत असणारा त्यांचा चुलत भाऊ नाथ प्रल्हाद शिर्के (वय 9 ) हा घाबरला. मात्र त्याच अवस्थेत त्याने शिर्के यांच्या घरी पळत येऊन अविष्कार व अधिराज पाण्यात पडल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्व कुटुंबीयांनी शेततळ्याकडे धाव घेतली. मुलांना पाण्यातून बाहेर काढून तात्काळ पुढील उपचारासाठी इंदापूर येथे आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.किशोर शिर्के व शितल शिर्के या दांमत्यास ही दोनच मुले होती. मात्र ऐण सणासुदीच्या दिवशी काळाने घाला घातला आणि ही दोन्ही पाखरे दिसेनाशी झाली. ही घटना गावभर पसरताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. मातृत्वाला हेलावून टाकणारी घटना असल्यामुळे या घटनेबाबत राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींमधून हळहळ व्यक्त होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies