मुंबईत पावसाची दमदार बॅटींग, कालपासुन सुरु असलेल्या पावसाने मुंबानगरीचा वेग मंदावला

काल नवी मुंबईमध्ये 134.78 मिमी. पावसाची नोंद

मुंबई । कालपासुन सुरु असलेल्या पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले. एकीकडे कोरोनामुळे मुंबई काही प्रमाणात ठप्प असुन मुसळधार पावसाने पुन्हा मुंबईचा वेग मंदावला आहे. नवी मुंबई मध्ये रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती, सकाळी पावसाने थोडा वेळ विश्रांती घेतली असताना पुन्हा पावसाने जोर धरला असून नवी मुंबई परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे. काल दिवसभरात नवी मुंबईमध्ये सरासरी 134.78 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies