Hathras Gang Rape : राहुल गांधींना पोलीसांकडून धक्काबुक्की, कॉग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पोलीसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे

लखनऊ । हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांना यमुना एक्सप्रेस-वेवर रोखण्यात आले होते. त्यानंतर राहुल गांधी यांना पोलीसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्काराचे पडसाद संपूर्ण देशभरात पसरत आहे. आज हाथरस येथे 144 कलमाअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आल्याने तेथे कोणालाही जाण्यास बंदी घालण्यात आली होती.

देशभरातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी राहुल गांधी यांची कॉलर पकडण्यात आल्याचे सांगितले जात आहे व पोलिसांसोबत झालेल्या धक्काबुक्कीत राहुल गांधी जमिनीवर पडले. यावेळी त्यांच्यासोबत काही काँग्रेस कार्यकर्ते व नेतेही होते. मात्र अशाही परिस्थितीत राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेणारच असल्याचे सांगितले आहे. 'कितीही झालं तरी मी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही', असे राहुल गांधींनी सांगितले आहे.



AM News Developed by Kalavati Technologies