Hathras Case: पीडितेचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

हाथरस येथे झालेल्या सामुहिक बलात्कारात पीडितेचा मृत्यू झाला होता, आज त्या तरुणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे

लखनऊ । उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणाने संपुर्ण देश हादरून निघाले आहे. आज पीडितेचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडितेचा पोस्टमार्टम केला होता. त्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सदरील पीडितेचा मृत्यू गळ्याचे हाड तुटल्याने झाला आहे. वारंवारं गळा दाबल्याने पीडितेच्या गळ्याचे हाड तुटले आहे. तसेच गळ्यावर त्यासंबंधी खुणाही मिळाल्याचे रुग्णालयाने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या रिपोर्टमध्ये बलात्काराचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

गळा दाबल्याने सर्वायकल स्पाईन तुटले त्यामुळे तरूणीचा मृत्यू झाला असे सफदरजंग रुग्णालयाने दिलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आले आहे. दरम्यान याआधी अलीगढच्या जेएन मेडिकल कॉलेजने सुद्धा गळ्याचे हाड तुटल्याने सदरील तरुणीचा मृत्यू झाला आहे म्हटले आहे. मात्र या रिपोर्टमध्ये सुद्धा बलात्काराचा उल्लेख केलेला नव्हता. दरम्यान, मृत्यूपुर्वी पीडितेने दिलेल्या जबानीत म्हटले होते की, तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. त्यांतर ओढणीने बांधुन तिचा गळा दाबण्यात आला आहे. असे पीडितेने मृत्यूपुर्वी म्हटले होते.AM News Developed by Kalavati Technologies