हर्षवर्धन पाटलांचा वाद दीराशी मग नवरा कशाला सोडायचा?, सुप्रिया सुळेंचा टोला

देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये अलिबाबा आणि 40 चोर असं म्हटलं होतं

औरंगाबाद । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरु आहे. हे पक्षांतर म्हणजे भांडण दिराशी आणि ते नवरा सोडताहेत, अशी अवस्था असल्याची तिरकस टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केली. शिवाय, हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत बोलण्यासाठी आपण दोन दिवस प्रयत्न केले, असेही त्यांनी नमुद केले.

औरंगाबादमधील एमजीएम महाविद्यालयात बोलताना सुप्रिया सुळेंनी विविध विषयांवर भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये अलिबाबा आणि 40 चोर असं म्हटलं होतं. आता त्यापैकी अनेक जण त्यांनी स्वतःच्या पक्ष घेतले आहेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.AM News Developed by Kalavati Technologies