रांगोळीच्या कलाकृतीतून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

परभणी जिल्ह्यातील ज्ञानेश्वर बर्वे व प्रमोद उबाळे यांनी धोनीची भव्य अशी रांगोळी काढून दिल्या शुभेच्छा

परभणी । भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा आज 39वा वाढदिवस त्यानिमित्ताने अनेक चाहते त्यांना वेगवेगळ्या प्रकारे शुभेच्छा देत आहेत. मात्र परभणी जिल्ह्यातील ज्ञानेश्वर बर्वे व प्रमोद उबाळे यांनी भव्य अशा रांगोळीतुन त्यांचे चित्र रेखाटून आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकून जागतिक स्तरावर श्रेष्ठ कर्णधार व विकट किपर म्हणून नावलौकिक मिळविला आहे. क्रिकेटमध्ये धोनी यांच्या विनिंग शॉट्सची नेहमीच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात.

अशा सर्वश्रेष्ठ माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा आज वाढदिवस या निमित्ताने परभणीतील कलाकार ज्ञानेश्वर बर्वे, प्रमोद उबाळे, यांच्यासह मारुती देशमुख, गोपाळ वडवाले, ऋषिकेश काकडे, तेजस देशमुख यांनी भव्य अशा रांगोळीच्या माध्यमातून धोनी यांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या. या रांगोळीचे सध्या जिल्हाभर कौतुक होत आहे. दिग्गजांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्याचे याआधीही पाहिले आहे मात्र, परभणीसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या कलाकारांनी रांगोळीच्या माध्यमातून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies