गुलाबराव पाटलांच नारायण राणेंना प्रत्युत्तर

नारायण राणे हे शिवसेनेमुळेच रस्त्यावर - गुलाबराव पाटील

जळगाव - नारायण राणे यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले होते. कोरोनाचा सामना करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी', अशी मागणी राणे यांनी केली होती. त्यावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिले आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वांनी सरकारला साथ देण्याची गरज आहे. उपाययोजनांमध्ये कुठे त्रुटी राहत असतील, तर त्या सरकारच्या लक्षात आणून दिल्या पाहिजेत. पण असे न करता नारायण राणे यांनी राज्यपालांकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. नारायण राणे यांच्यासारख्या मुख्यमंत्री पद भूषवलेल्या व्यक्तीला 'या' गोष्टी शोभत नसल्याची टीका पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी नारायण राणे हे शिवसेनेमुळेच रस्त्यावर आल्याचा हल्लाबोलही केला.AM News Developed by Kalavati Technologies