अकोल्यात कोरोनाचा वाढता आलेख; 38 नव्या रुग्णांची भर

अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच, आज 38 नवीन रुग्णांची नोंद

अकोला |  कोरोना व्हायरसचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. आज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात आणखी 38 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 हजार 703 इतकी झाली आहे. तर एक्टिव्ह रुग्णांची संख्या 359 वर पोहचली आहे. याचदरम्यान आज एकाचा मृत्युही झाला आहे. आजच्या प्राप्त अहवालात 38 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यातील 11 महिला तर 27 पुरुष आहेत.

यातील 8 जण पक्की खोली येथील, 7 जण आदर्श कॉलनी, 7 जण अकोट, 5 जण चांदुर, 2 जण बार्शीटाकळी, 2 जण कच्ची खोली तर उर्वरित राधाकिसन प्लॉट, जुने शहर, वाडेगाव, पातुर, साईनगर, महान आणि नानक नगर येथील 1 - 1 याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान, काल रात्री एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण 82 वर्षीय पुरुष असून सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहे. तो दि.२ रोजी दाखल झाला होता. काल रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला.AM News Developed by Kalavati Technologies