परभणीत क्रांतिदिनी हुतात्म्यांना अभिवादन; 9 ऑगस्ट 1942 रोजी पेटली होती क्रांतीची ठिणगी

9 ऑगस्ट 1942 रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती; या लढ्यात परभणी जिल्ह्यातील काही लोकांनी हौतात्म्य पत्करले होते

परभणी । देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस 9 ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिन. भारत छोडो आंदोलन खरोखरच एक सामुदायिक चळवळ होते ज्यात लाखो सामान्य हिंदुस्तानी सहभागी झाले होते. स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाभूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस. 9 ऑगस्ट 1942 रोजी क्रांतीची ठिणगी पेटली होती. या लढ्यात परभणी जिल्ह्यातील काही लोकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांतिलढ्याची आठवण म्हणून 9 ऑगस्टला ‘क्रांती दिन’ पाळला जातो.

परभणीतील क्रांती चौकात हुतात्मा स्तंभास महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बाळनाथ देशपांडे, मधुकर उमरीकर, प्रकाश बारबिंड, प्रमोद बल्लाळ, संजय पांडे यांची उपस्थिती होती.AM News Developed by Kalavati Technologies