औरंगाबादकरांना मोठा दिलासा; कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 683 वर, दिवसभरात 31 जणांना डिस्चार्ज

आज पहाटे शहरात 28 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असली तरी दुसरीकडून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.  मिनी घाटी येथे 27 जण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळते आहे. त्यामुळं औरंगाबादेत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 683 इतकी झाली आहे. मात्र कोरोनाबाबत जिल्ह्याला थोडाफार दिलासा मिळाला असला तरी दर दिवसाला कोरोनाबाधित रुग्णांच्या संखेत वाढ होत आहे. आज पहाटे शहरात 28 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळं कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 276 वर गेला आहे. तसेच आतापर्यंत या आजारानं 48 जणांचा बळी घेतला आहे.AM News Developed by Kalavati Technologies