पदवी परीक्षा होणारच, विद्यार्थ्यांना परीक्षाशिवाय पदवी देता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय

विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पदवी देता येणार असल्याचं निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर कायम आहे. अशातच पदवी परिक्षा घेऊ नका असे अनेक जण विधान करीत आहे. मात्र आज सुप्रीम कोर्टाने पदवी परिक्षांवर आपला निर्णय दिला आहे. न्यायालयाने सांगितले आहे की, ज्या राज्यांना वाटत आहे की त्यांना परीक्षा घेणे शक्य नाही, त्या राज्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे जावे. परंतु राज्य अंतिम सत्र परीक्षा घेतल्याशिवाय पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करू शकत नाहीत.

तसेच 30 सप्टेंबरपर्यंत परिक्षा घेण्याच्या यूजीसीच्या निर्णायावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती एम.आर. शाह यांच्या खंडपीठाने सांगितले की, राज्य आणि विद्यापीठे विद्यार्थ्यांना परिक्षा न घेता पास करू शकत नाही. कोरोनाची पार्श्वभूमीवर लक्षात घेता संबंधित राज्यांना, यूजीसीला संपर्क करून परिक्षा स्थगितीबाबत चर्चा करावी लागणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies