कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण; तिघा आरोपींच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी सध्या कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू आहे.

कोल्हापूर | कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकारात पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित आरोपी सचिन अंदुरे याने गुन्हा कबुल करण्यासाठी तपास अधिकारी अमृत देशमुख यांनी 50 लाखाची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणी ताब्यात असलेल्या सचिन अंदुरे, गणेश मिस्किन आणि अमित बद्दी यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी सध्या कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू आहे. गेल्या आठवड्यात कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणी ताब्यात असलेल्या सचिन अंदुरे, गणेश मिस्किन आणि अमित बद्दी यांना अटक केली होती. यावेळी न्यायालयाने तिघा आरोपींना पोलीस कोठडीत रवानगी केली होती. आज तिघा आरोपींची पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान या तिघांच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सुनावणीवेळी सचिन अंदुरे याने गुन्हा कबुल करण्यासाठी तपास अधिकारी अमृत देशमुख यांनी 50 लाखाची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा केला. शिवाय बंदूकधारी पोलीस घेऊन दबाव टाकून चौकशी होत असल्याचा आरोपही त्याने केला. याची नोंद आज न्यायालयाने घेतली.

दरम्यान आजच्या सुनावणीत संशयित आरोपीनी पानसरे यांच्या कार्यालय परिसरात रेकी केल्याची कोल्हापूरपासून दोन तासावरील जंगलात एअर पिस्टलचे प्रशिक्षण घेतल्याची तसेच आणखी तिघे आरोपी यामध्ये सहभागी असल्याची माहिती पुढे येत असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्यावर हा केवळ बनाव असल्याच सांगत सरकारी वकिलांचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी खोडून काढला आहे.AM News Developed by Kalavati Technologies