जालन्यात रंगणार खोतकर विरूध्द गोरंट्याल 'कांटे की टक्कर'

आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जालना | विधानसभेच्या निवडणुकीत मी ऐतिहासिक मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला. जालना विधानसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून कैलास गोरंट्याल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कोणतंही शक्ती प्रदर्शन न करता अगदी साधेपणाने गोरंट्याल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान या निवडणुकीत मी अर्जुन खोतकरांना पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवणार असल्याचा विश्वास गोरंट्याल यांनी व्यक्त केला.AM News Developed by Kalavati Technologies