एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; राज्य सरकारकडून 550 कोटींचा निधी मंजूर

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 550 कोटी मंजूर झाल्याने, एसटीच्या 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे

मुंबई । कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकले होते. त्यामुळे कित्येंक दिवसांपासून थकित वेतन मिळावे यासाठी राज्यभरातून मागणी केली जात होती. त्यापार्श्वभुमीवर राज्यसरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनासाठी 550 कोटी रुपये मंजूर केले आहे. उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी या निर्णयाची ट्विटरवरून माहिती दिली आहे.

तसेच कर्मचाऱ्यांचे पगार लवकरात-लवकर होतील, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. या बैठकीला अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि गृहराज्य मंत्री सतेज पाटील बैठकीला उपस्थित होते. अनिल परब यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार! उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 550 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार लवकरच होतील."AM News Developed by Kalavati Technologies