मुंबईकरांसाठी खुशखबर, लवकरच सेवेत एसी लोकल

...निर्मिती युद्ध पातळीवर सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले

मुंबई । मध्य रेल्वेचे प्रवासी जीची आतुरतेने वाट पहात होते ती एसी लोकल आज इगतपुरी मार्गे मुंबईकडे रवाना झाली आहे. मध्य रेल्वे प्रशासन मुंबईच्या प्रवाशांसाठी खास एसी लोकल सुरू करणार आहे. या पार्श्वभूमीवर झांसी, इटारसी व कोलकत्ता येथील रेल्वेच्या कारखान्यात या एसी लोकलची निर्मिती केली जात आहे. या कारखान्यांमधून आठवड्याला 2 ते 3 एसी लोकल मुंबईला जात आहेत. रेल्वे प्रशासन लवकरच मध्य, हार्बर, व पश्चिम मार्गावर या लोकल सेवा सुरू करणार आहे. यासाठी झांसी, इटारसी व कोलकत्ता येथील कारखान्यात एसी लोकलची निर्मिती युद्ध पातळीवर सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies