पुणे-बंगळुरु राष्ट्रीय मार्गावर खासगी बसमधून 3 कोटी 64 लाखांचे सोने-चांदीचे दागिने जप्त

साताऱ्यात पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे एका ट्रॅव्हलवर, पोलीसांनी छापा टाकून 3 कोटी 64 लाखांचे सोनं-चांदीचे दागिने जप्त केले आहे

सातारा । साताऱ्यात पुणे बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे एका ट्रॅव्हल्सवर छापा टाकत सातारा पोलिसांनी अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या 3 कोटी 64 लाख रुपये किमतीचे सोने चांदीच्या वस्तू जप्त केले आहेत. या प्रकरणाचा तपास बोरगाव पोलिस करीत आहेत. सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हल्समधून अवैधरित्या चांदीची वाहतूक होणार असल्याची माहिती बोरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ यांना मिळाली होती.

त्या माहितीच्या आधारे महामार्गावर नागठाणे चौकात पोलिसांनी कोल्हापुरहून आलेली खाजगी ट्रॅव्हल्स थांबवून तिची झडती घेतली, असता बसच्या डिकीमध्ये 25 गोणी संशयास्पद असल्याच्या निदर्शनास आल्या. पोलिसांनी बस बोरगाव पोलीस ठाण्यात आणून ही पोती ताब्यात घेतली. या पोत्यांमध्ये उघडुन पाहिले असता. त्यात 3 कोटी 54 लाख 76 हजार 800 रुपयांची 591 किलो ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि वस्तू मिळाले असुन, 9 लाख 37 हजार 300 रुपयांचे एकूण 19 तोळे वजनाचा सोन्याचे दागिने सापडले आहेत.

त्यामध्ये लाख, गोंडा, दुशीये वेगवेगळे दागिने असे एकुण 2 किलो 150 ग्रॅमचे सोनेसदृश वस्तू आहे. या गोण्यांविषयी बस चालकाकडे चौकशी केली असता, त्याने कोल्हापुर येथील सोनसिंग परमार, अमोल भोसले, मनोजकुमार परमार यांची नावे सांगितली. या तिघांची चौकशी करुन पोलिसांनी या सर्व चांदी सोन्याचे बील मागितले असता. त्यांनी समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने बोरगाव पोलिसांनी हा सर्व माल जप्त केला आहे. या प्रकरणात कोल्हापुरहून मुंबईकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात चांदी सोन्याचे 25 गोणी कोणाकडे घेऊन हि ट्रॅव्हल निघाली होती याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies