वाळुज हद्दीत चोरी, रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागीने लंपास

15 लाख रुपयांचा ऐवज लंपास

वाळुज | वाळुज पसरिरातील शेंदूरवादा शिवारातील शिवपूर येथे अज्ञात चोरट्यांनी एका प्रगतीशील शेतकर्याचे घर फोडून, रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने मिळून अंदाजे 15 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवार दिनांक 26 मे रोजी पहाटे उघडकीस आली. शिवपूर येथील दादासाहेब एकनाथ दुबिले यांचे तीन भावांचे कुटुंब असून त्यांच्याकडे 70 एकर बागायती शेती आहे. ते प्रगतीशील शेतकरी असून शेतीसह त्यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे.

नेहमीप्रमाणे जेवण करून सर्व जण झोपले असता रात्री 12 वाजेच्या सुमारास शेतात लाईट आल्याने दादासाहेब दुबिले यांचे दोन भाऊ व दोन मुले शेताला पाणी देण्यासाठी गेले.तर त्यांच्या पत्नी, दोन भावजया व लहान मुले, मुली गर्मी होत असल्याने घराच्या गच्चीवर झोपायला गेले होते.त्यामुळे दादासाहेब दुबिले हे एकटेच घरात झोपले.रात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या जिन्याचे लॉक तोडून घरात प्रवेश केला.व घराच्या आठ खोल्यातील तीन कपाट फोडून आतील रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने मिळून अंदाजे 10 ते 15 लाखांचा ऐवज लंपास केला. पहाटे दादासाहेब यांना जाग आली असता घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले.

घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणाजी सावंत, पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख यांनी घटनास्थळाची पाहनी केली.तसेच श्वानपथकाच्या मदतीने माग काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना घटनास्थळा पासून काही अंतरावर चोरीला गेलेले काही समान व एक मोबाईल मिळुण आला.या प्रकरणी वाळुज पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies