जायकवाडी धरण 90.23% भरले, गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा

लोकांनी गोदावरी नदी पात्रामध्ये जाऊ नये व जनावराना नदी पात्रात जाऊ देऊ नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

पालम (परभणी) | पालम गोदावरी गंगेच्या पात्रात पाणी येणार असल्याने पालम तालूक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पैठणमधील जायकवाडी नाथ सागर येथील घरण 90.23% भरले आहे. यामुळे या धरणाचे दरवाचे कोणत्याही क्षणी उघडले जाऊ शकतात. यामुळे ह सर्व पाणी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल. त्यामूळे गोदावरी नदीकाठी आसलेल्या गांवाच्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लोकांनी गोदावरी नदी पात्रामध्ये जाऊ नये व जनावराना नदी पात्रात जाऊ देऊ नये अशा सुचना पालम तहसिलदारांकडून देण्यात आल्या आहेत. तरी नागरिकांनी सर्तक रहावे असे प्रशासनाने कळविले आहे. पालम तालूक्यातील उमरथड़ी, आरखेड, मुंबर, सोमेश्र्वर, फळा, फरकडा, डिग्रस, धानोरा, सागवी, भोगाव, दुटका, गुज, रहाटी आदी गावे गंगेकाठी आहेत. या गावातील नागरीकाना सर्तकेचा इशारा देण्यात आला आहे.

जायकवाडी धरण
1) जायकवाड़ी धरणाची पाणी पातळी:- 
1520.20 फुट
463.357 मी.

2) आवक :- 13339 क्युसेक 
3) एकूण पाणी साठा:-2697.089दलघमी     
4)जिवंत पाणी  साठा:- 1958.983 दलघमी
5) धरणाची टक्केवारी:- 90.23%
6) उजवा कालवा विसर्ग :- 900 क्यूसेक्स
7) डावा कालवा विसर्ग :- 400 क्यूसेक्स
8)पैठण जलविद्युत केंद्रामधुन  विसर्ग = 1589 क्यूसेक
10) पाण्याची आवक घटली..AM News Developed by Kalavati Technologies