गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची बाधा, स्वत: ट्वीट करून दिली माहिती

कोणतीही लक्षणे नसल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत घरातच विलगीकरणात राहत आहेत.

पणजी । देशातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा जवळपास 40 लाखांच्या घरात आहे. कोरोनामुळे आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांना ग्रस्त केले आहे. आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यांना कोणतीही तीव्र वा सौम्य लक्षणे नाहीत. यामुळे सध्या घरीच ते विलगीकरणात राहत आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्वीट करून म्हटले की, 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला कोणतीही लक्षणे नाहीत म्हणून घरातच विलगीकरणात राहत आहे. असे असले तरी मी माझ्या घरातूनच कर्तव्य पार पाडणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

मंगळवारी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा कोरोना अहवाल पुन्हा एकदा सकारात्मक आला. सीएम खट्टर यांची गत रविवारी कोरोना चाचणी पुन्हा एकदा घेण्यात आली होती. यावेळीही त्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे. यामुळे आणखी काही दिवस त्यांना मेदांता रुग्णालयात राहावे लागणार आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना कोरोनाच्या संसर्गामुळे 25 ऑगस्ट रोजी गुरुग्राममधील मेदांता येथे दाखल करण्यात आले होते.



AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: