शिरूरमध्ये पाच वर्षीय मुलीला कोरोनाची लागण, बाधितांचा आकडा 16 वर

3 किलोमीटर पर्यंतचा परिसर सिल

पुणे | पुणे जिल्हाच्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील पाच वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली असून रात्री या मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंत कवठे येमाई येथील एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वी या कुटूबांतील पाच वर्षीय चिमुकलीचा आणि आजी-आजोबा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्यानंतर रात्री पुन्हा दुसऱ्या जुळ्या मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव आला आहे.या सर्व रूग्णावरती पुण्यातील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून हे सर्व कुटुंबीय पंधरा तारखेला मुंबई येथून आपल्या मूळ गावी आले होते . परिसर आता कन्टेंटमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून 3 किलोमीटर पर्यंतचा परिसर सिल करण्यात आला आहे.

शिरूर तालुक्यात आतापर्यंत 16 रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून, यात सात रुग्ण बरे झाले तर सहा जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यात शिरूर तालुक्यात बाहेरून आलेले सहा जणांचा समावेश आहे.

आतापर्यंत शिरूर तालुक्यातील
सणसवाडी 1
शिक्रापूर 3
विठ्ठलवाडी 1
तळेगाव ढमढेरे 4 
शिवतक्रार माळुंगी 2
कवठे यमाई 4
कारेगाव 1
असे कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले. कोरोनामुळे तळेगाव ढमढेरे येथील एक महिला, शिक्रापूर येथील एका कामगार तरुणाचा, तर कारेगाव येथील एका वृद्ध महिला असे तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies