5 वर्ष चालणार गांगुलीची ‘दादा’गिरी

बीसीसीआयची ही मागणी मान्य केली तर याचा फायदा केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांनाही होणार

स्पोर्ट डेस्क । टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचा कार्यकाळ किमान 5 वर्षे वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी घेतला. मुंबईतील रविवारच्या बोर्डाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या निर्णयावर शिक्कामोर्तब करून तो अंतिम मंजुरीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आला. आता न्यायालयाने या प्रस्तावास मंजुरी दिली तर 2024 पर्यंत गांगुलीची ‘दादागिरी’ बोर्डावर चालणार आहे. अन्यथा 9 महिन्यांचा कालावधी संपल्यावर बोर्डाला गांगुली यांच्या जागी नवा अध्यक्ष बसवावा लागेल.

सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयने रविवारी सर्वोच्च न्यायालयाने पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार गांगुलीचा नऊ महिन्यांचा कार्यकाळ पुढे नेण्याचा प्रयत्न बीसीसीआयने केला. हा निर्णय बीसीसीआयच्या 88 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची मान्यता घ्यावी लागणार आहे. एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की सर्व प्रस्तावित दुरुस्ती मंजूर झाल्या आहेत आणि आता सर्वोच्च न्यायालयात पाठविण्यात येतील.

जर सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयची ही मागणी मान्य केली तर याचा फायदा केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांनाही होणार आहे. त्यांचा बीसीसीआयचा सचिव पदाचा कार्यकाळही वर्षापेक्षा कमी राहिला आहे. याचबरोबर बीसीसीआयने या सर्वसाधारण सभेत जय शहा यांना आयसीसीच्या कार्यकारी समितीच्या बैठकांना भारताचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. जय शहा हे बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांची जागा घेतील.AM News Developed by Kalavati Technologies