Gangster Vikas Dubey Encounter: गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार

पोलिस चकमकीत गंभीर जखमी झाल्याने डॉक्टरांनी विकास दुबेला केले मृत घोषित

लखनऊ । आठ पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे. एन्काऊंटरमध्ये गंभीर जखमी झालेल्या विकास दुबेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र पोलिसांनी त्याला मृत घोषित केले. विकास दुबेला काल उज्जैन येथुन अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्याला कानपुर येथे हलवण्यात येणार होते. त्याला गाडीतून नेत असतांना गाडीचा अपघात झाला.

त्यादरम्यान पोलिसांची बंदुक घेऊन त्याने पळ काढली, त्यादरम्यान पोलीस आणि दुबेमध्ये चकमक झाली. त्या चकमकीत दुबे गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी कानपुरला दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कानपुरच्या बिकरु गावात त्याला पकडण्य़ासाठी गेलेल्या पोलिसांवर केलेल्या गोळीबारात एक अधिकाऱ्यासह आणखी आठ पोलीस कर्मचारी शहीद झाले होतेे. त्या घटनेनंतर पोलीस विकास दुबेला पकडण्यासाठी कसुन शोध घेत होती. गुरुवारी त्याला उज्जैन येथील महाकाल मंदिरात अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. आणि आज त्याला कानपुर येथे हलवण्यात येणार होेते परंतु अचानक गाडीचा अपघात झाल्याने विकास दुबेने पळ काढला, त्यानंतर चकमकीत तो ठार झाला.AM News Developed by Kalavati Technologies