गंगापूर शहरांमध्ये होत आहे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ, आज आढळले 7 पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 157 वर

आज गंगापुर आणि वाळूज परिसरात प्रत्येकी 3-3 रुग्णांची वाढ, तर मालुंजा परिसरातही आढळला 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

गंगापुर । बुधवारी घेण्यात आलेल्या 21 स्वॅबपैकी 7 जण पॉझिटिव्ह आले असुन, 17 जण हे निगेटिव्ह आले आहे. गंगापुर शहरात 3 तर वाळूज परिसरात 3 रुग्ण आढळले आले तर मालुंजा या ग्रामीण भागातही 1 रुग्ण आढळून आला आहे.
गंगापुर शहरांची एकूण रुग्णसंख्या 157 झाली असुन, यामध्ये 55 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सुदैवाने तालुक्यातील ग्रामीण भागातील 2 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 89 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती गंगापुर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी नोडल सुदाम लगास यांनी दिली आहे.
गंगापुर स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने उर्वरीत कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे एस.बी.आय. ही बॅंक बंद करण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies