अजित दादांना राखी बांधताना घडला गंमतीशीर प्रकार...

बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी पवार कुटुंबियांनी रक्षाबंधनाचा सण केला साजरा

बारामती । भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन आज देशभरात साजरा होत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रक्षाबंधन सण आपल्या कुटुंबियांसोबत साजरा केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी कुटुंबासोबत हा रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना राखी बांधली. यावेळी कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे अजितदादा हातातील ग्लोजसह घरी दाखल झाले होते.

सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना ओवाळून राखी बांधली. पण, झाले असे की, सुप्रियाताईंनी अजितदादांसाठी टोपी आणली होती, पण अजितदादांना टोपी घालायचं लक्षातच राहिलं नाही. त्यामुळे 'अरे टोपी इथंच राहिली' म्हणून अजित दादांनाही हसू आवरले नाही. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा बाजूलाच खुर्चीवर बसलेले होते. हा सगऴा प्रकार पाहून त्यांनाही हसू उमटले. राखी बांधल्यानंतर अजित दादांनी आपल्या बहिणीचे आशिर्वाद सुद्धा घेतले.
दरवर्षी पवार कुटुंबीयांच्या घरी मोठ्या उत्साहाने रक्षाबंधन साजरा होतो. सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडिओ शेअर करून सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्या दिल्या आहे.AM News Developed by Kalavati Technologies