दिल्लीतील निगमबोध घाटावर जेटलींवर उद्या अंत्यसंस्कार

दिल्लीतील निगमबोध घाटावर जेटलींवर उद्या अंत्यसंस्कार

 नवी दिल्ली । माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर रविवारी दुपारी निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. भाजप नेते सुधांशु मित्तल यांनी याची माहिती दिली. जेटलींनी शनिवारी दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना 9 ऑगस्ट रोजी एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. नवी दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश मुकला आहे.AM News Developed by Kalavati Technologies